Devendra Fadnavis | ‘मोदी वाघाप्रमाणे, जंगलातील कितीही जनावरे…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरुन विरोधकांनी मोट बांधायला सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), नितिश कुमार (Nitish Kumar) यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) रणनीती आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या या ऐक्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल केला. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजप (BJP) पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, देशात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पटण्यात रॅली करणार आहेत. प्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली 2019 मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या (Congress) निवडून आल्या नाहीत. मंचावर 55 लोक होते आणि काँग्रेसच्या 48 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे मी तर त्यांना आव्हान करतो, तुम्ही एकत्रित येत आहेत, एकत्रित लढणार आहात. तुम्हाला मतदान देण्याआधी केवळ एवढंच सांगा की, तुमचा नेता कोण आहे? असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे.

 

ते वाघाची शिकार करु शकत नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ममता बॅनर्जींनी सांगितलं, काँग्रेस कम्युनिस्टांसोबत चालली, आम्ही त्यांना मानत नाहीत. नितीश कुमारांनी एकाला काढून टाकले. कोणी कोणाला नेता मानायला तयार नाही. त्यामुळे कितीही लोक एकत्र आले, जंगलातील किती जनावरे एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करु शकत नाहीत. त्या वाघाप्रमाणे मोदी आहेत. कितीही एकत्रित आले तरीही मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. राजा राजाच असतो. मागच्या लोकसभेत 302 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा जास्त जागा घेऊन 2024 मध्ये मोदी निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवला. दरम्यान, फडणवीस यांनी येथे वापरण्यात आलेल्या जनावरांचा उल्लेख शब्दश: न घेण्याचंही मिश्किल आवाहन केलं.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis targeted over oppositions unity against narendra modi and bjp free india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा