Ashish Deshmukh | फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थिती आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश, फडणवीसांना दिला ‘हा’ शब्द (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसमधून (Congress) निलंबित केलेले नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजपा (BJP) पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली.

 

‘सुबह का भुला शाम को वापस आये तो उसे भुला नही कहते’, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली. तसेच झालेल्या चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मला भाजपमध्ये पुन्हा येताना आनंद होत असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

 

 

तर राहुल गांधींची खासदारकी गेली नसती

आशिष देशमुख म्हणाले, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कॉल लावला तर कॉल लागत नव्हता, त्यांचे कॉल मला येत नव्हते. मी इतका वाईट नाही की काँग्रेसने मला निष्कासित केलं. मी ओबीसीची (OBC) बिनशर्त माफी मागावी एवढीच मागणी केली होती. या आधीही राफेल प्रकरणात (Rafale Case) त्यांनी माफी मागितली होती. काँग्रेस आणि गांधी परिवार ओबीसी विरोधी आहेत. मंडल कमीशनला (Mandal Commission) त्यांनी विरोध केला होता. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर आज त्यांची खासदारकी गेली नसती.

 

2024 ची निवडणूक लढवणार नाही

मी 2024 ची कुठलीही निवडणूक लढवणार नाही, ओबीसी आणि विदर्भासाठी काम करेल.
काटोल मधील काकागिरी, सावनेर मधील दादागिरी आणि विदर्भातील नानागिरी संपविण्याचे काम करेल.
भाजप जो उमेदवार देईल त्याला जिंकून आणण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन असे देशमुख यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  Ashish Deshmukh | ashish deshmukh joins bjp today in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा