Pune ACB Trap | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डिनला 16 लाखाच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक; जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील (PMC Medical College) अधिष्ठाता (डिन) आशिष श्रीनाथ बनगिनवार Dr Ashish Shrinath Banginwar (54, पद – अधिष्ठाता) यांना 16 लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Pune Bribe Case). याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डिन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी 22 लाख 50 हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Trap)

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आशिष बनगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी तडजोडीअंती 16 लाख रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपये बनगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

त्यांच्याविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade)
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav) यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम