पुणे अपघात : ‘त्या’ ९ जणांमधील जुबेरला व्हायचं होतं CA

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शुक्रवारी मध्यरात्री पावने एकच्या सुमारास सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव इर्टिका गाडी आणि ट्रकचा हा अपघात होता. या अपघातात अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव,निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी या नऊ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणारा हा अपघात होता. यातील आठ जण एकाच शाळेत शिकत होते. शाळेनंतरही हे एकत्रित होते.

या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न होते. त्यातील जुबेर अजिज मुलाणी हा एका स्क्रॅपच्या दुकानात काम करत होता. तो कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात होता. जुबेरला बी कॉम केल्यानंतर सीए चे शिक्षण घेत हाेता. त्याला सीए बनायचे होते, त्याचे हे स्वप्न त्या दुकानाच्या मालकाने सांगितले.

जुबेरचे वडील माझ्या स्क्रॅपच्या दुकानात काम करत होते. त्यांचा मुलगा जुबेर हा बी. कॉम करत होता, म्हणून मी त्याला दुकानाच्या बँकेचे व्यवहार पाहण्याचे काम दिले होते. जुबेर अत्यंत हुशार होता. कामावर घेतानाच त्याला विचारलं होते की तुला काय व्हायचं, तर त्याने त्याचे सीए होण्याचे स्वप्न त्यांना सांगितले होते. तो त्यासाठी प्रयत्न ही करत होता. कॉलेज करून तो काम कारायचा, दोन्हीचे नियोजन त्यांने खुप छान पद्धतीने केले होते, असं जुबेरच्या दुकान मालकांनी सांगितले.

दरम्यान, या अपघातात या नऊ मित्रांच्या आयुष्यावर काळाने घात घातला. त्यांचा तर जीव गेलाच पण त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरल्या आहेत. तरूण आणि आपल्या भविष्यासाठी शिकणाऱ्या जुबेरप्रमाणे इतरांचेही स्वप्नही भंगले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like