Pune : भरधाव दुचाकी जागेवर थांबलेल्या डंपरला धडकली, दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव दुचाकीने उभारलेल्या डंपरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला. उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे.

समीर कासीम पठाण (वय 19, रा. चंदनवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर (दि. 30 एप्रिल) गेल्या आठवड्यात दुचाकीवरून घरी जात होता. त्याची दुचाकीवर वेगात होती. पण, अचानक खेडकर मळा येथे आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर तो उभ्या असलेल्या टेम्पोला जाऊन धडकला. यात समीर हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचा उपचारसुरु असताना मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.

रस्त्याने पायी चालत निघालेल्या 13 वर्षीय मुलाला भरधाव रिक्षाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. संगमब्रिजवर ही घटना घडली आहे.

बरकतसिंग टाक (वय 13), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खडकी येथील संगमब्रिजवरून सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ब्रिजवरून पायी चालला असताना त्याला पाठीमागून भरधाव आलेल्या रिक्षाने जोरात धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. यातच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.