Pune Accident News | रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून तरुणाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील वाहनाची धडक बसून एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सोलापूर रोडवरील (Pune Solapur Road) कुंजीरवाडी येथील नायगाव चौकात रविवारी (दि.7) सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident News )

लखन गायकवाड (वय-36) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लखनचा चुलत भाऊ सागर रामचंद्र गायकवाड (वय – 35 रा. नायगाव चौक, कुंजीरवाडी) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर आयपीसी 304अ, 338, 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन गायकवाड पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील नायगाव चौकात
रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाची धडक लखन याला बसली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लखनला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल
केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात नशा करण्यासाठी बेकायदेशीर इजेक्शनची विक्री, एकाला अटक

तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला तळेगाव दाभाडे पोलिसांकडून अटक

Pune BJP On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा, टेंपररी आमदार – भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे

Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Chronic Garbage Spots | पुण्यात कचरा टाकण्यात येणारे आणि साठला जाणारे नऊशे ‘क्राॅनिक स्पाॅट’ ! 161 ‘स्पाॅट’ कचरा मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला यश