Pune Accident News | चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

शेलपिंपळगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक समोरील कंटेनरला बसल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात चाकण-शिक्रापूर रोडवर (Chakan-Shikrapur Road) झाला असून या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू (Youths Died) झाला आहे. (Pune Accident News)

आदित्य धर्मा मेमाने Aditya Dharma Memane (वय 27, रा. कुरुळी, ता. खेड) व अमोल व्यंकटराव लोमटे Amol Venkatarao Lomte (वय 32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णवाहिकाचालक दिनेश जोगदंड (Dinesh Jogdand) यांनी चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मेमाने आणि अमोल लोमटे हे एकमेकांचे मित्र आहेत. ते चाकण-शिक्रापूर रोडने कारमधून (एमएच 14 जेयु 4248) जात होते. आदित्य हा कार चालवत होता. आदित्यने कार भरधाव वेगात चालवून (Pune Crime News) समोरील कंटेनरला पाठिमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन आदित्य आणि अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Accident News | car collides with container on chakan shikrapur road two youths died on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा