Tax Return Process | करोडो टॅक्सपेयर्ससाठी मोठी अपडेट, CBDT ने दिली ही माहिती; ऐकून व्हाल खुश

नवी दिल्ली : Tax Return Process | तुम्ही सुद्धा दरवर्षी आयटीआर (Income Tax Return) फाईल करत असाल तर ही बातमी तुम्हाला खुश करणारी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) एका वक्तव्यात म्हटले आहे की,‍ टॅक्‍सपेयरकडून (Taxpayer) व्हेर‍िफकेशन झाल्यानंतर प्राप्तीकर रिटर्न प्रोसेस (Tax Return Process) करण्याचा कालावधी कमी करून १० दिवस करण्यात आला आहे. सीबीडीटीने म्हटले की, अखंडित आणि तत्पर टॅक्सपेयर्स सर्व्हिस देण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) सतत प्रयत्नशील आहे.

प्रोसेस‍िंग टाइम केला १० दिवसांचा
सीबीडीटीने म्हटले, याचाच परिणाम आहे की, असेसमेंट ईयर (AY) २०२३-२४ साठी दाखल रिटर्नसाठी व्हेर‍िफ‍केशननंतर प्राप्तीकर रिटर्नचा अ‍ॅव्हरेज प्रोसेस‍िंग टाइम २०१९-२० च्या ८२ दिवस आणि २०२२-२३ च्या १६ दिवसांच्या तुलनेत कमी करून १० दिवस केला आहे. वक्तव्यात म्हटले आहे की, इन्कम टॅक्‍स विभाग तत्पर आणि कुशल पद्धतीने टॅक्‍स रिटर्न प्रोसेस‍िंग करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

६.९८ कोटी आयटीआर दाखल
५ सप्टेंबरपर्यंत असेसमेन्ट ईयर २०२३-२४ साठी ६.९८ कोटी आयटीआर दाखल केले गेले, ज्यापैकी ६.८४ कोटीचे व्हेरि‍फि‍केशन करण्यात आले आहे. ५ सप्टेंबरपर्यंत व्हेरिफाय टॅक्‍स रिटर्नपैकी २०२३-२४ च्या ६ कोटीपेक्षा जास्त टॅक्‍स रिटर्न प्रोसेस केले गेले आहेत. याचा परिणाम म्हणजे ८८% पेक्षा जास्त व्हेरि‍फाईड टॅक्‍स रिटर्न प्रोसेस्‍ड झाले आहेत. सध्याच्या असेसमेंट ईयरसाठी २.४५ कोटीपेक्षा जास्त रिफंड अगोदरच जारी झाला आहे. (Tax Return Process)

सीबीडीटीने हे सुद्धा सांगितले की, विभागाला टॅक्‍सपेयर्सकडून काही माहिती न मिळाल्याने काही टॅक्‍स रिटर्न प्रोसेस्‍ड
करता आले नाहीत. मागील दिवसात जारी आकड्यानुसार, २०२३-२४ साठी सुमारे १४ लाख आयटीआर टॅक्‍सपेयर्सकडून व्हेरिफाय होणे बाकी होते.

सीबीडीटी (CBDT) ने म्हटले, रिटर्न व्हेर‍िफकेशन न झाल्याने प्रोसेस‍िंगला उशीर होतो.
कारण, टॅक्‍सपेयरकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच रिटर्नचे प्रोसेस‍िंग केले जाऊ शकते.
सुमारे १२ लाख व्हेरि‍फाईड आयटीआरबाबत विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Happy Hormones Foods | कुटुंबात ठेवायचे असेल आनंदाचे वातावरण?
डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 5 फूड्स, हॅप्पी हार्मोन्स होतील बूस्ट