Pune Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एका तरुणाचा मृत्यू; हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident News) शनिवारी (दि.21) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीच्या गेट समोर झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका अनोळखी दुचाकीस्वार व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रदिप अनिल दाभाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संदीप संतोष गराडे (वय-24 रा. मु.पो. चांदखेड ता. मावळ) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच 14 बी.एच 5265 वरील अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 279, 304अ, 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रदिप दाभाडे असे दोघे चांदखेड वरुन हिंजवडी कडे कामावर
जात होते. दोघेजण संदीप याच्या दुचाकीवरुन (एमएच 14 एफ झेड 6556) जात होते.
कोलते पाटील सोसायटीच्या गेट समोरील मदरसन कंपनी समोर मारुंजी रोड येथून स्प्लेंडर गाडीवरुन आरोपी भरधाव
वेगात आला. आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी हयगयीने चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडकला. यामध्ये संदिप व प्रदीप दोघेही रस्त्यावर पडले. यात फिर्यादी यांचा मित्र प्रदीप हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार