पुणे : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

किरकोळ कारणावरुन तरुणावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपींना खडक पोलिसांनी हडपसर येथे सापळा रचून अटक केली. ही कारवाई वडकीनाला करिश्मा हॉटेल हडपसर येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन एकाला अटक केली. ही घटना एक महिन्यापूर्वी सारसबाग चौपाटी येथे घडली होती.

राजेश सतिश कसबे (वय-१९ रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा १७ वर्षीय साथिदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B0784SX2SP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cde43504-8064-11e8-8f37-c3c463f3f7a0′]

एक महिन्यापूर्वी सारसबाग चौपाटी येथे विकास गोविंद कांबळे याला मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथील करिश्मा हॉटेल येथे येणार असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे  पोलीस शिपाई आशीष चव्हाण यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साध्या वेषात जाऊन आरोपींना अटक केली. आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई परिमंडळ -१ चे पोलीस उप आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस शिपाई रवि लोखंडे, आशिष चव्हाण यांच्या पथकाने केली.