Pune : गोव्यात हनीमूनला गेल्यानंतर पतीनं 23 वर्षीय पत्नीसोबत केलं अनैसर्गिक कृत्य, पुण्यात परतल्यानंतर भोंदूबाबा अन् अनेक टेस्ट…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘हनिमून’ला गोव्यात गेल्यानंतर पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केले. पुण्यात परत आल्यानंतर एका भोंदूबाबाला घरी बोलवले व त्याच्या सांगण्यावरून विवाहितेला ‘तुझ्यात दोष’ असे म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर तिला मुद्दाम वेगवेगळ्या तीन मोठ्या रुग्णालयात ‘अनेक टेस्ट’ करण्यास सांगत तिच्याकडे 5 लाखांची मागणी केली आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 28 वर्षीय पती त्याचे आई-वडील, मोठ्या व लहान भावावर IPC कलम 498, 377 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गृहिणी आहेत. तर पती खासगी कंपनीत नोकरी करतो. दरम्यान त्यांचा मे 2019 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर ते गोव्याला हनिमूनला गेले होते. पण तेथे गेल्यावर विवाहितेला मासिक पाळी आली. पण त्यानंतर देखील आरोपी पतीने जबरदस्ती करत अनैसर्गिक अत्याचार केले. यानंतर ते काही दिवसांनी परत आले. मात्र विवाहीता आजारी पडली. यावेळी पतीच्या कुटुंबियांनी एक भोंदूबा घरी बोलावला. त्याला घरात फिरून काही दोष आहे का, हे पाहण्यास सांगितले. यानंतर तो भोंदूबाबा घरात फिरला. यावेळी त्याने घरात दोष नसून तुमच्या सुनेत दोष असल्याचे सांगितले. यानंतर त्याने फिर्यादी यांना बसवून त्यांच्या हातात एक लिंबू दिले व तो काही तरी बदबदला. यानंतर तो भोंदूबाबा निघून गेला.

यानंतर विवाहितेला पती व सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करत तिचा छळ केला. यानंतर तिला माहेरी आणून सोडले व तिच्या कुटुंबास मुलगी नांदवायची असल्यास मोठ्या रुग्णालयात तिचे सर्व टेस्ट करण्यास सांगितले. कुटुंबाने सर्व टेस्ट करून घेतल्या. पण तरीही नंतर आरोपींनी आणखी एका रुग्णालयात जाऊन टेस्ट करायला सांगितले. अश्या प्रकारे त्यांनी 3 रुग्णालयातून टेस्ट करण्यास भाग पाडले. पण त्या तिन्ही टेस्टमध्ये त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले. तरीही सासरच्या मंडळींनी तिला नांदवण्यास नेले नाही. तर घेऊन जाण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा नेणार नाही असे म्हणत धमकी दिली आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.