पुणे : कर्जाची रक्कम परत न केल्याने पुतण्याचे केले अपहरण

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करत नसल्याच्या कारणावरुन कर्जदाराच्या अल्पवयीन पुतण्याचे अपहरण केल्याची घटना येरवडा येथे घडली. ही घटना मंगळारी (दि.१०) रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

विशाल दत्तात्रय ढोले(वय २५ रा.सणसवाडी शिक्रापूर), स्वप्नील शांताराम तांबे (वय २५ रा. गणेगाव वरुडे, शिरूर) सचिन बंडू थिटे (रा. सणसवाडी शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. किसन धोंडिबा जाधव (वय ५०, रा. डॉ. आंबेडकर हाउसिंग सोसायटी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
[amazon_link asins=’B078TLWQ93′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f48badea-85cb-11e8-b440-f7485aa66a84′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी किसन जाधव यांनी आरोपी विशाल ढोले याचा भाऊ निखील ढोले याचे कडून व्यवसायासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेसाठी ढोले याने जाधव यांच्याकडे तगादा लावला होता. मंगळवारी रात्री किसन जाधव यांचा १७ वर्षांचा पुतण्या फिरण्यासाठी गेला होता.

आरोपींनी जाधव यांच्या पुतण्याला बोलावून घेतले. आरोपींनी त्याला चार चाकी गाडीत बळजबरीने बसवून पळवून नेले. रात्री उशीरापर्य़ंत पुतण्या घरी न आल्याने जाधव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सीडीआर व तपास पथकामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली .या तिघांनी सदरच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून टाटा गार्ड रूम येथे त्याला लपवून ठेवले असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली.
[amazon_link asins=’B06XHM2MJ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’001c7e38-85cc-11e8-8468-997fe297ad63′]

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हरिश्चंद्र मोरे, हनुमंत जाधव यांच्या पथकाने अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली. तिघाही आरोपींना चारचाकी झेन कार (एमएच ०२ पीए ९५१६) सह ताब्यात घेण्यात आले .अधिक तपासात त्यांनी अल्पवयीन बालकाचे कर्जाऊ रक्कम परत न केल्यामुळे अपहरण केल्याचे कबूल केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.