Pune Air Pollution | प्रदूषणकारक धुलीकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना न करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायीकांना महापालिकेची नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Air Pollution | प्रदूषणकारक धुलीकणांवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना न करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) नोटीस पाठविली आहे (PMC Notice To Six Builders). त्याचप्रमाणे राडा रोडा वाहतुक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (Pune Air Pollution)

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील वायु प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या राज्य सरकार आणि महापालिकांनी नियमावली जाहीर केली. शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचे पालन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून होत नसल्याचे आढळून आले आहे.

यामुळे आता प्रशासनाकडून कठोर भुमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सहा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस दिली आहे. बांधकामाच्या ठिकाणी बाजुने पत्रे न उभारणे, धुळीचा प्रवास रोखण्यासाठी हिरवे कापड न लावणे आदी उपाय योजना न केल्यामुळे या नोटीस दिल्या गेल्या आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणाहून राडारोडा, खोदकाम केल्यानंतरचा मुरुम, माती आदीची वाहतुक करणार्‍यांनी तो झाकून नेला नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली नाही तर कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. (Pune Air Pollution)

दरम्यान, रस्ते स्वच्छतेवेळी पाणी वापरणे आवश्यक असताना खर्च वाचवण्यासाठी ठेकेदरांकडून वर्दळीच्या रस्त्यांवर धूळ उडवली जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ठेकेदारास सूचना दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. तसेच हे प्रकार न थांबल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पथ विभागाच्या ठेकेदारांकडून रस्त्यांची स्वच्छता हवेच्या प्रेशरने केली जात असून, प्रचंड धूळ उडवली जात आहे. धायरी फाटा ते नवले हॉस्पिटल रस्त्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीसाठी त्यावरील धूळ बाजूला करणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्रशर असलेल्या वाहनाने (बुमर) रस्ते साफ करणे आवश्यक आहे. पण, ठेकेदार थेट हवेच्या प्रेशरने रस्त्यावर वर्दळ असतानाही धूळ उडवली जात आहे. ही धुळ काढली नाही तर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही असा दावा पथ विभागाकडून केला जात आहे.

महापालिकेमध्ये सर्व क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सर्वच अधिकार्‍यांना त्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण
रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्थापन केलेल्या पथकाचा रोजचा अहवाल
गुगल शीटवर पाठविण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये महापालिका,
शासकिय तसेच खाजगी बांधकामांचाही समावेश आहे. पुरेशा उपाययोजना केल्या नसल्याचे
आढळल्यास संबधित काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar), अतिरिक्त महापालिका आयुक्त

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक, म्हणाले – ”पुण्याचं भाग्य की…”

Pune Pimpri Crime News | हिंजवडी : लग्नास नकार दिल्याने इंजिनिअर तरुणीची आत्महत्या, प्रियकरावर FIR