Pune Pimpri Crime News | हिंजवडी : लग्नास नकार दिल्याने इंजिनिअर तरुणीची आत्महत्या, प्रियकरावर FIR

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका 24 वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हिंजवडी येथे घडली आहे. याप्रकरणी प्रियकरावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Pimpri Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने मंगळवारी (दि.21) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी गौरव पाटील (रा. धुळे) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख (API Sandeep Deshmukh) यांनी दिलेल्या महितीनुसार, मुलगी आणि आरोपी हे दोघे इंजिनिअर आहेत. त्यांची कॉलेज पासून ओळख आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहेत. तरीही गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध (Love Affair) ठेवले. त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे फिर्यादी यांच्या मुलीला नैराश्य आले. यातूनच तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बहिणीच्या बालविवाहाचा भावानेच केला पर्दाफाश, लग्न लावणाऱ्या भटजीसह 10 जणांवर FIR; पिंपरी चिंचवड मधील प्रकार

तळेगाव दाभाडे : बनावट कागदपत्राच्या आधारे वनविभागाच्या जमिनीची विक्री, ठाण्यातील तिघांवर गुन्हा दाखल

सराईत वाहन चोराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, रिक्षा व दुचाकी जप्त

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा केला बनाव, लोणी काळभोर पोलिसांकडून काही तासात गुन्हा उघड; आरोपीला अटक

कोर्टात पोहोचण्यास उशीर, दोन पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा

गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या आणून थेट समुद्रात टाकल्या, व्हिडिओ पाहिल्यावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई