Coroanavirus : पुणे शहरात आज 328 तर पिंपरीत 161 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी (दि.19) 328 रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 279 रुग्णांना घरी सोडण्यात आले. शहरातील विविध रुग्णालयातील 388 क्रिटिकल रुग्णावर उपचार सुरु असून दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 102 इतकी झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 388 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून यातील 237 रुग्ण व्हेंटिलोटरवर असून 151 रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 572 इतकी झाली आहे. दिवसभरात 279 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 66 हजार 069 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण रुग्णसंख्या 1 लाख 75 हजार 743 झाली आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 102 इतकी आहे. आज शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 929 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पिंपरीत 161 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात 161 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 हजार 231 वर पोहचली आहे. शहरात आज दिवसभरात महापालिका हद्दीतील 1 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज 77 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 91 लाख 784 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरामध्ये सध्या 754 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2447 इतकी झाली असून यामध्ये 1734 शहरातील तर 713 हद्दीबाहेरील रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हद्दी बाहेरील 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर शहरातील 116 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.