Coronavirus Lockdown 3.0 : पुणे अन पिंपरी-चिंचवड एकच झोन, शहराचे कोणतेही zone पडणार नाहीत, कोणत्या देखील सवलती नसतील

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवताना सरकारने देशात तीन झोन तयार केले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या तीन विभागात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात कोणताही झोन लागू होणार नाही. दोन्ही शहरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी पूर्ववत लागू राहणार असून कोणतीही सवलत मिळणार नाही.

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची परवानी केंद्र सरकारने दिली. तसेच ग्रीन झोनमध्ये मद्य, पान, सिगारेट, तंबाखू विक्रीची दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार राज्यातील इतर भागांसाठीच्या मार्गदर्शन सूचना दिल्या आहे. मात्र, यातून पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि मालेगाव ही शहरे वगळली आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये कोणतेही झोन पडणार नसून लॉकडाऊची स्थिती जशी आहे तशीच राहणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असलेल्या चार वॉर्डमध्ये ऑरेंज झोन तयार करून या ठिकाणच्या नागरिकांना काही सवलती देण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर शनिवारी सकाळी सुरु झाल्या होत्या. ऑरेंज झोनमध्ये या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत आणि या ठिकाणचे उद्योग, दुकाने, छोटे-मोठे व्यवसाय, नागरिकांचे जाणे-येणे यात सवलती देण्याचा विचार करण्यात येत होता. परंतु राज्य सरकारने संध्याकाळी काढलेल्या आदेशानंतर या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याच भागाला कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेच आयुक्त शेखर गायवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या आदेशानंतर पुण्यात झोन तयार करून सूट देण्याचा विषय आता मागे पडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुण्यात कोणत्याही सवलती लागू होणार नाहीत. लॉकडाऊनचे पालन पूर्वीसारखेच कडक करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्वीच्या वेळेनुसार सुरु राहणार आहेत.