Pune Anti Corruption | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यासह एका संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Anti Corruption | पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड- KCC) प्रकरण मंजूर करण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच घेणार्‍या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या pune district central cooperative bank (शाखा-वाघोली) पद-विकास अधिकार्‍यासह बोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) आज (बुधवार) वाघोलीमध्ये रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाघोली शाखेतील पद-विकास अधिकारी दीपक रामचंद्र सायकर (Deepak Ramchandra Saikar) आणि बोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, वाडेबोल्हाईचे सचिव गोपीनाथ दत्तात्रय इंगळे (Gopinath Dattatraya Ingle) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांना पीक कर्ज corp loan (किसान क्रेडिट कार्ड – kisan credit card) हवे होते. ते प्रकरण मंजूर करण्यासाठी आरोपींनी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. 5 हजाराची लाच घेताना गोपीनाथ इंगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
(Addl SP Suhas Nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे
(Police Inspector Shreeram Shinde) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Anti Corruption | Secretary of an organization with an officer of Pune District Central Co-operative Bank in the net of anti-corruption, huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corporator Archana Patil | आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण ! नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मागणीला मुख्य सभेची मान्यता

Municipal Elections | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मुंबई वगळता पुणे-पिंपरीसह सर्वच महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक

Mumbai Crime | ‘सेक्स टॉय’ आणि ‘अंतर्वस्त्रे’ पाठवून दिला जातोय अभिनेत्रीला त्रास