शिरूरमधील आढळरावांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी ; २००२ पासुन जि.प. सदस्य असलेल्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर लोकसभा मतदार संघातुन शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाला तर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव सेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्ष विरोधी काम करणार्‍या पदाधिकार्‍यांवर आता शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आणि सन 2002 पासुन जि.प. सदस्य असणार्‍या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशा बुचके यांचा चांगला जनसंपर्क आहे. गेल्या 15 वर्षापेक्षा अधिक काळापासुन त्या सक्रिय राजकारणात आहेत. सन 2009 आणि सन 2014 मध्ये त्यांनी जुन्‍नर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शिरूर लोकसभा मतदार संघातच जुन्‍नर विधानसभा मतदार संघ येतो. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आशा बुचके यांनी पक्ष विरोधी काम केलं असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांची आता हकालपट्टी करण्यात आली आहे. आशा बुचके यांच्याबरोबर इतर काही जणांची गच्छंती झाली आहे.

शिरूरचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांना देखील पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जि.प. सदस्य माऊली कटके यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात तालुका प्रमुख नेमण्यात आले आहेत. जुन्‍नरसाठी माऊली खंडागळे, आंबेगावसाठी अरूण गिरे, खेड-आळंदीसाठी रामदास धनवटे आणि शिरूरच्या 39 गावांसाठी गणेश जामदार यांची तालुका प्रमुख म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरातील देखील 2 शहर प्रमुख पद रद्द करण्यात आली होती.

आरोग्य विषयक वृत्त –
फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !
वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !
‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण
या ‘मार्गांचा’ अवलंब करा आयुष्यात व्हाल यशस्वी