Pune Band | मंगळवारी पुणे बंद; विविध राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Band | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून मंगळवार (दि.13) बंद (Pune Band) पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघानेदेखील पाठिंबा दिला आहे. पुणे बंददरम्यान संपूर्ण मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने घेतला आहे.

 

दरम्यान, संभाजी बिग्रेड (Sambhaji Brigade), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shiv Sena), आर.पी.आय. (R.P.I.) या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला (Pune Band) पाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले.

 

त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुणे बंदमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दिल्यानंतर आज अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीनं पुणे बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समितीचे समन्वयक संतोष नांगरे यांनी सांगितले.

 

पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
त्यामुळे वाहनचालकांनी पर्य़ायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने (Pune Traffic Branch) केले आहे.

 

Web Title :- Pune Band | Pune closed on Tuesday; Participation of various political parties, organizations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार