Pune Bhavani Peth Crime | भवानी पेठेत शाळकरी मुलाला बेदम मारहाण, तीन अल्पवयीन मुलांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bhavani Peth Crime | शाळेत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिन अल्पवयीन मुलांनी एकाला फायटरने मारुन जखमी केले. हा प्रकार भवानी पेठेतील टिंबर मार्केट (Timber Market Pune) येथील आचार्य विनोबा भावे म.न.पा. शाळेच्या (Acharya Vinoba Bhave School Pune) समोरील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.28) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत 16 वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्य़ादीचे एका अल्पवयीन आरोपीसोबत शाळेत भांडण झाले होते. शाळेत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या मित्राला फायटरने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी मुलाला शिवीगाळ करुन मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.(Pune Bhavani Peth Crime)

दुचाकीस्वाराला दगडाने मारहाण

विमानतळ : रिक्षाला पाय लागल्याच्या रागातून रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.27) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खराडी (Kharadi) येथील जनक बाबा दर्गा चौकात घडली. याबाबत राजीवरंजन रमाकांत सिंग (वय-26 रा. ऐश्वर्या कॉलनी, वाघोली) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी रिक्षाचालक समीर पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी त्यांच्या दुचाकीवरुन कामावर जात होते. नगर रोडवर सिग्नलला थांबले असता फिर्य़ादी यांचा पाय आरोपीच्या रिक्षाला लागला. याचा राग आल्याने आरोपीने रिक्षाजवळ पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार बी.आर. पाबळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Polls | दांडगा जनसंपर्क व नातेवाईकांच्या गोतावळ्याची शिवाजी मानकर यांना ताकद, पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

दाजीकडून अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; वडगाव भागातील प्रकार

इन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बिबवेवाडी भागातील घटना

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल