Pune Bhor News – Bee Attack | विसर्जनासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला, 150 हून अधिक जखमी; पुणे जिल्ह्यातील घटना

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bhor News – Bee Attack | पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा प्रकार भोर तालुक्यातील हिर्डोशी येथे शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. या घटनेत मधमाशांनी चावा घेतल्याने लोकांचे तोंड, डोके, डोळे, हात पाय सुजले आहेत. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश असून या सर्वांवर हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करण्यात आले. (Pune Bhor News – Bee Attack)

हिर्डोशी येथील सोमजाईवस्ती, हरळीचा माळ आणि टाकीचा माळ येथील नागरिक शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारस स्मशानभूमी जवळ असलेल्या नीरा देवधर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी काल विसर्जन मिरवणूक पोहचली. गणपती व गौरी विसर्जनापुर्वी आरती सुरु असताना अचानक मधमाशा आल्या व आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर हल्ला केला. यावेळी लहान मुले, महिला, पुरुष असे 150 हून अधिक जण उपस्थित होते. मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने सर्वजण वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. (Pune Bhor News – Bee Attack)

काही तासाने मधमाशाचा थवा गेल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामनसे ग्रामस्थांनी टाकीचा माळ, हरळीचा माळ व सोमजाईवस्ती येथील नागरिकांच्या गणेश व गौरी विसर्जन एकञीत केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’