home page top 1

शहर शिवसेनेत मोठे फेरबदल, यापुढे शहर प्रमुख ‘पद’ नसणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेत बदल करण्यात आले आहेत. दोन्ही शहर प्रमुख पदाना स्थगिती देताना, यापुढे शहर प्रमुख नेमणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी महापालिकेतही खांदेपालट करताना गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून शहर शिवसेनेची घडी विस्कळीत झाली आहे. 90 च्या दशकात शहरात संघटनेच्या माध्यमातून दबदबा निर्माण करणाऱ्या शिवसेनेने चांगली ताकद वाढवली होती. भाजप सोबत असलेल्या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना व्हायचा. एवढेच न्हवे तर शहरात कोथरूड, शिवाजीनगर , जुन्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातून शिवसेनेचे आमदारही निवडून आले आहेत. परंतु मागील आठ दहा वर्षांत पक्षाची घडी विस्कटत गेली आहे.

शहर वाढत असताना एक च्या ऐवजी दोन शहर प्रमुख, पाठोपाठ शहर उप प्रमुख आशा नेमणुका केल्या जाऊ लागल्या. परंतु यानंतरही अंतर्गत लाथळ्यांमुळे संघटनेची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. अंतर्गत वादाच्या तक्रारींमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पुणे शहराकडे पाठच फिरवली. 2014 मध्ये पराभूत झालेले आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांच्याकडे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

तत्पूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती संपुष्टात आली. शहरात एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र हे सातत्य 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राखता आले नाही. माजी आमदार विनायक निम्हण यांच्या शहर प्रमुख पदाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे जेमतेम 10 नगरसेवक निवडून आले. नुकतेच लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सोबत युती झाली. त्यामुळे शिवसेनेला पालिकेच्या सत्तेत चंचू प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र, या वाटाघाटीतही ‘ते’ नेतृत्व अपयशी ठरले. पालिकेतील विविध समित्यांवर नियुक्ती असो अथवा प्रभाग समिती सदस्य नियुक्ती असो शिवसेना नेतृत्वाच्या हेकेखोर आणि आवास्तव मागणीमुळे येथेही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना संधीपासून वंचित राहावे लागले. याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे बोलले जात आहे.

 

चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांची शहर प्रमुख पदे स्थगित करण्यासोबत गटनेते संजय भोसले यांना बाजूला सारून पृथ्वीराज सुतार यांची नियुक्ती करण्यात आली. तर आठही मतदार संघांच्या विभाग प्रमुखांकडेच अधिकार देण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रानी दिली.

आरोग्य विषयक वृत्त

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

Loading...
You might also like