Pune BJP News | पुणे भाजपमध्ये खांदेपालट होणार, नवीन शहराध्यक्ष, 2 जिल्हाध्यक्ष शनिवारपर्यंत निश्चित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP News | पुण्यातील भाजपची समीकरणे बदलताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे भाजपमध्ये (BJP) खांदेपालट होणार आहे. (BJP Pune News) भाजपच्या जिल्हाध्यक्ष (District President) आणि शहराध्यक्षांच्या (City President) बदलीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० मेपर्यंत नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून यावेळी जिल्ह्यात मावळची मक्तेदारी संपण्याची शक्यता आहे. (Pune BJP News)

सध्याचे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. शहराध्यक्षपदासाठी राजकीय वर्तुळात काही नावांची जोरदार चर्चा आहे, यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) , आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी सभागृहनेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) आणि धीरज घाटे (Dheeraj Ghate ) व माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (MLA. Medha Kulkarni) यांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी कोण सक्षम व इच्छुक आहे, याची शोधाशोध प्रभारींनी करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील विविध आघाड्यांच्या प्रमुखांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात आली असून आगामी निवडणुका लक्षात घेऊन शहराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

शहराध्यक्ष निवडीबाबत शहरात अनेक नावे समोर असताना जिल्ह्याधक्ष निवडताना मात्र भाजपसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात दोन अध्यक्ष निवडण्यात येणार असल्यामुळे जिल्हाची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात रचना करण्यात आली आहे.
यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मावळ तर दक्षिण पुणे जिल्ह्यात मुळशी, भोर,
वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड हे तालुके असणार आहेत. (Pune BJP News)

दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) सोडून जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही.
यापूर्वी मावळ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे बोलले जाते होते.
शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपचे आमदार होते. मात्र हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या हातातून गेले आहेत.
मावळ तालुक्याकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्हाध्यक्षपद होते.
सन २०१९ च्या निवडणुकीत संजय भेगडे यांचा पराभव झाला. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते.
संजय भेगडे यांचे निकटवर्तीय गणेश भेगडे (Ganesh Bhegade) सध्या जिल्हाध्यक्ष आहेत.
खेडमधून शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil), जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे
(Dharmendra Khandare), प्रदीप कंद (Pradeep Kand), दौंडमधून राहुल कुल यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title :  Pune BJP News | bjps new city president two district presidents will be decided by may 20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार