Pune BJP Protest | आयुक्तांनी रस्त्यावर फिरावे म्हणजे खड्डयांमुळे होणारे नागरिकांचे हाल समजतील; मा. स्थायी समिती सदस्या व महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना पाटील यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP Protest | पुणे शहरात रस्त्यांची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे खड्ड्यांमुळे (Pune Potholes) हाल सुरू असून अनेक जीवघेणे अपघात घडत असताना प्रशासन Pune Municipal Corporation (PMC) सुस्तपणे कारभार करीत आहे. अशी टीका आज भाजपा महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चना पाटील (Archana Tushar Patil) यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर केली. (Pune BJP Protest)

शहरातील खड्डयांच्या प्रश्नासंदर्भात आज महिला आघाडीने आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात त्या बोलत होत्या. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धिरजजी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला मा. उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, मा. नगरसेविका अर्चना मुसळे, ज्योती कळमकर, मनीषा कदम, राजर्षी शिळीमकर, मंजुश्री खर्डेकर, मंजुषा नागपुरे, स्वाती लोखंडे, उज्वला जंगले, मुक्ता जगताप आणि पदाधिकारी कांचन कुंबरे, आशाताई बिबवे, रेश्मा सय्यद, राणी कांबळे व सर्व महिला सहकारी उपस्थित होत्या. (Pune BJP Protest)

शहरातील सर्व भागात खड्डयांचे साम्राज्य झाले असताना प्रशासन मात्र सुस्त बसले आहे.
नव्या सॉफ्टवेअरचे कारण पुढे करत अनेक रस्ते दुरूस्तीच्या कामांचे वर्क ऑर्डर दोन दोन महीने रखडले आहेत.
दुसरीकडे काही ठेकेदारांची तीस- चाळीस टक्के कमी दराने आलेली कंत्राटे मंजूर केली जात आहेत.
अशा दर्जाहीन कामांना मंजुरी देऊन प्रशासन नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे. अशा शब्दांत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल