Pune BJP | भारतीय जनता पार्टी च्या ‘सुपर वॉरियर्स’ ची बैठक संपन्न

पुणे : Pune BJP | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सुपर वॉरियर्स च्या बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (Pune BJP)

पुणे शहरातील सुमारे 700 प्रमुख पदाधिकारी ह्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी सुपर वॉरियर्स चे काम बूथ संघटन आदी विषयावर मार्गदर्शन केले. (Pune News)

बावनकुळे म्हणाले ‘ आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळणार आहे याची संपूर्ण
खात्री आहे बूथ लेवल पर्यंत संपर्क प्रभावी पणे काम करण्यासाठी आपण सुपर वॉरियर्स ची संकल्पना राबवत आहोत
जेणे करून ते सुपर वॉरियर्स हे 3 बूथ वरील मतदानाची टक्केवारीत भर पाडतील. या मध्ये खासदार , मदर ,नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी हे 3 बुथचे सुपर वॉरियर्स असतील’.पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्याने आगामी काळात पूर्णपणे झोकून देऊन काम केल्यास लोकसभा , विधानसभा ,आणि महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी बहुमताने जिंकेल यात काहीच शंका नाही.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ,खासदार प्रकाश जावडेकर,आमदार माधुरी मिसाळ ,
सुनील कांबळे सिदार्थ शिरोळे,शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील,
प्रदेश सचिव वर्षा डहाळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रभारी माधव भंडारी , माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,
पुणे लोकसभा संयोजक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने ,सुशील मेंगडे,पुनीत जोशी , महेश पुंडे , राजेंद्र शिळीमकर ,
रवींद्र साळेगावकर , वर्षा तापकीर, राहुल भंडारे , सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या सह प्रवेश केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकावर FIR

MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)