Pune Camp News | पुणे कॅम्प परिसरातील बसस्टॉपचे शेड कोसळले, 6 नागरिक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Camp News | पुण्यातील कॅम्प भागातील पीएमटीचा (PMT) बस स्टॉप (Pune Camp News) आज दुपारी अचानक कोसळला (collapse). यामध्ये बसस्टॉपवर उभे असलेले सहा नागरिक जखमी (six civilians injured) झाले आहेत. ही घटना पुणे कॅम्प (Pune Camp News) भागातील वेस्ट अँड सिनेमाजवळ (West End Cinema) घडली. जखमी झालेल्या नागरिकांना ताततडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

वेस्ट अँड सिनेमाजवळ असलेला पीएमटी बसस्टॉपचे शेड आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक कोसळले. या बसस्टॉप वरुन आळंदी, पुणे स्टेशन, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाण्यासाठी बसेस थांबतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिक बसची वाट पहात उभे होते. दुपारी सव्वा एकच्या सुमारास अचानक या बस स्टॉपचे शेड कोसळल्याने सहा प्रवासी नागरिक जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच लष्कर वाहतूक विभागाचे (lashkar traffic department) पोलीस उपनिरीक्षक महेश अबनवे (PSI Mahesh Abnave) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी बस स्टॉपच्या शेडखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले.
तसेच मुख्य रस्त्यावर पडलेले शेड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

Web Title :- Pune Camp News | shed bus stop collapsed camp pune six civilians were injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | स्वत:चा बिझनेस सुरू करायचा असेल तर मोदी सरकारची ‘ही’ योजना करेल मदत, मिळतील 10 लाख

Pune Crime Branch Police | गुन्हे शाखेकडून परराज्यातील तीन नागरिकांना अटक, 3 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Former Minister Sanjay Rathod | ‘त्या’ महिलेच्या आरोपांबाबत पोलीस नोंदवणार आता माजी वनमंत्री संजय राठोड यांचा जबाब