पुण्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईला निघाला होता कॅबचालक अन् वाटेतच…

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातून प्रवाशांना घेऊन मुंबईला जाणाऱ्या कॅबचालकाला मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.13) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भूमकर चौकात घडला.

बाळासाहेब कोंडीबा बंडगर (वय-28 रा. ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सलमान साबीर शेख (वय-21 रा. काळेवाडी), शुभम श्रीकांत जाधव (वय-19 रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी), प्रेम बालाजी पोतदार (वय-19 रा. काळेवाडी), ललीत हरीकेस कटरोटिया (वय-20 रा. काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर त्यांचा एक साथिदार फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबचालक बंडगर यांना शुक्रवारी रात्री मुंबईचे प्रवासी भाडे मिळाले होते. तो पुण्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भूमकर चौकात कार आली असता, आरोपींनी दुचाकी आडवी घातली आणि चाककूचा धाक दाखवला. बंडगर यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 15 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.