पुण्यातील शुक्रवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकामधील ATM सेंटरच्या CCTV कॅमेर्‍याची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करुन चोरट्याने रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. शुक्रवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकातील एटीएम केंद्रात दोन दिवसांपूर्वी घडली आहे.

याप्रकरणी सुयोग परमाळे (वय ३७, रा. धनकवडी )यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रभूषण चौकातील गरुडा कॉम्पेक्समध्ये स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. दोन दिवसांपुर्वी चोरट्याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन तेथील सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यानंतर एटीएम मशीन उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अधिक खडक पोलीस करत आहेत.