Pune : विमानतळ, बिबवेवाडी परिसरात चेन स्नॅचिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील स्ट्रीट क्राईम कमी होत नसून, रस्त्यांवरील गुन्हेगाराने उच्छाद घातला आहे. होळीच्या सणाला देखील शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचे समोर आले आहे. विमानतळ व बिबवेवाडी भागात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात ताराचंद खंडागळे (वय 47) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडागळे हे यमुनानगर येथे राहतात. ते रविवारी सकाळी अकराच्या सुमारास श्रीकृष्ण चौकात पीएमपी स्थानकावर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने खंडागळे यांना तू साहेबांची डायरी चोरली असल्याचे बोलून झटापट करत त्यांच्या गळ्यातील 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. त्याने आरडाओरडा केला पण चोरटे पसार झाले. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत. तर दुसरी घटना बिबवेवाडी भागात घडली असून, याप्रकरणी 74 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. जेष्ठ महिला महेश सोसायटीसमोरून रविवारी दुपारी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन महिलेच्या गळ्यातील 87 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून चोरून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.