Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरच्या मेगाब्लॉकचे नियोजन

पुणे : Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पुल पाडण्यापूर्वीच्या कामासाठी आणि पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) करण्यात आले आहे. त्यानुसार पर्यायी बाह्य वळणाद्वारे वाहतुकीचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहे. अशी माहिती अशी माहिती एनएचआयकडून देण्यात आली. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

सध्या पुलाखालून गेलेल्या महानगरपालिकेच्या पाण्याच्या वाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने त्यासाठी पर्यायी लाईन टाकणे, जुने पाईप काढणे आदी कामासाठी वेळ लागत आहे. हे काम पूर्ण होताच, नियोजनानुसार पूल पाडण्याचे काम कऱण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर चांदणी चौकातील जुना पूल अडथळा ठरत असल्याने तो पाडण्यात येणार आहे. दिल्ली येथील खासगी कंपनीकडून हे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी कंपनीकडून करण्यात आली असून पूल पाडल्यानंतच्या वाहतुकीचे नियोजन महत्वाचे असून हे नियोजन करण्यात आले आहे.

चौकटपूल पाडल्यानंतर या मार्गाद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

– एनडीए- मुळशी ते बावधन पाषाण वारजे व मुळशीकडून पाषाण बावधन कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन सोडण्यात येईल.

– मुळशीकडून मुंबईच्या दिशने जाणारी वाहतूक रॅम्प तीनमार्गे रॅम्प सातद्वारे सोडण्यात येणार?आहे.

– मुंबई ते बावधन, पाषाण कोथरुड मुंबई ते बावधन, पाषाण ही वाहतूक पाषाण कनेक्टरद्वारे कोथरुड रॅम्पपासून पुढे खाली सोडण्यात येणार आहे.

– बावधन, पाषाण ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर कोथरुड अंडरपासमार्गे वेदविहार एन.डी.ए रस्त्याकडून मुंबई हायवेवर जोडण्यात येईल.

– बावधन, पाषाण ते सातारा वारजे मार्गावरील वाहतूक पाषाण कनेक्टरनंतर महामार्गावरून सातारा व वारजे कडे सोडण्यात येईल.

– कोथरुड ते मुंबई दरम्यानची वाहतूक कोथरुड अंडरपास ते वेदविहार एनडीए रस्त्यावरुन ते हायवेवर जोडण्यात येईल.

– कोथरूड ते एनडीए, मुळशी ही वाहतूक कोथरुड अंडरपासनंतर एनडीएवरून मुळशीच्या दिशेने जाईल.

– कोथरुड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा हायवे सेवा रस्त्यावरील श्रंगेरीमठाजवळून महामार्ग आणि पुढे सातारा व वारजेच्या दिशेने वळविण्यात आली?आहे.

– Satara, मुळशीकडून येणारी वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरुन एनडीएक चौकातून मुळशीच्या दिशेने सोडण्यात येईल.

– सातारा ते बावधन आणि पाषाण मार्गावरील वाहतूक रॅम्प सातवरून ते मुळशीरस्त्याच्या दिशेने नव्याने तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर थेट पाषाणकडे मार्गस्थ होईल.

– सातारा ते कोथरुड ही वाहतूक वेदविहार सेवा रस्त्यावरुन कोथरुड अंडरपासमार्गे सोडण्यात येईल.

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | Planning of megablock after bridge demolition at Chandni Chowk Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | अजित पवारांना मुख्यमंत्री करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना ‘ऑफर’