बँकेतून बोलत असल्याचे सांगत महिलेकडून 92 हजार उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बँक अधिकारी असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ९२ हजार उकळल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोथरूड भागात वास्तव्यास आहे. गेल्या महिन्यात महिलेला एका व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने बँक अधिकारी असल्याचे सांगितले. बँकेतील ग्राहकांची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून त्याने महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली होती. त्यानंतर महिलेच्या खात्यातून परस्पर ९२ हजार ९९१ रूपये काढून घेतले. खात्यातून पैसे काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.