Pune Cheating Fraud Case | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट (KYC Update) करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान ऑनलाईन घडला आहे. याबाबत नारायण दत्तात्रय निमकर (वय-70 रा. राजमयुर हौसिंग सोसायटी, एरंडवणे गावठाण) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 8 मार्च रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, आजची शेवटची तारीख आहे असे सांगितले. त्यानंतर पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी फिर्यादी यांना एक पाठवली.

फिर्यादी यांनी लिंक ओपन करुन त्यात त्यांची खासगी माहिती भरली. या माहितीचा वापर करुन फिर्यादी यांच्या खात्यातून परस्पर दोन लाख 13 हजार 700 रुपये काढून घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.(Pune Cheating Fraud Case)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक