Pune Cheating Fraud Case | तळेगाव दाभाडे : बनावट बँक खाते उघडून बिल्डरची 55 लाखांची फसवणूक

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | बांधकाम व्यवसायिकाच्या नावाने बँकेत बनावट खाते उघडून 55 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Pune Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सन 2016 ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान पी पारसिक सहकारी बँकेत घडला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गिरीश हरिश्चंद्र करंडे (वय-49 रा. मुरलीधर मंदीराजवळ, बुधवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी गुरुवारी (दि.16) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून प्रतिक मच्छिंद्र पाबळे (वय-30 रा. सत्यकमल कॉलनी, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) याच्यावर 420, 408, 465, 467, 468 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा अधीराज लँड डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे.
याठिकाणी आरोपी प्रतिक पाबळे हा 2016 पासून काम करतो. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला होता.
आरोपीने फिर्य़ादी यांच्या अधीराज लँड डेव्हलपर्स च्या नावाने पी पारसिक सहकारी बँकेत बनावट खाते उघडले.
प्रतिक पाबळे याने 2016 ते 5 फेब्रुवारी या दरम्यान वेळोवेळी फिर्यादी यांच्या व्यवसायाचे पैसे बनावट खात्यात जमा करुन घेत होता. प्रतिक याने फिर्यादी यांची 55 लाख 3 हजार 367 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार गिरीश करंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तळेगाव पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंपणे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | चव्हाणांमुळे नारायण राणेंना राजकीय संधीने दोन वेळा दिली हुलकावणी, अशोक चव्हाण म्हणाले, ”माझं येणं आणि…”

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना