Ashok Chavan | चव्हाणांमुळे नारायण राणेंना राजकीय संधीने दोन वेळा दिली हुलकावणी, अशोक चव्हाण म्हणाले, ”माझं येणं आणि…”

मुंबई : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून (Congress) भाजपात (BJP) प्रवेश केल्यानंतर ताबडतोब त्यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी मिळाली. तर अगोदरपासून दिल्लीत राज्यसभेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मात्र पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली नाही. यापूर्वी देखील राणे काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री पदाची आलेली संधी त्यांना हुलकावणी देत अशोक चव्हाणांना लाभली होती. याच राजकीय योगायोगावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Ashok Chavan)

भाजपाने नारायण राणेंऐवजी अशोक चव्हाणांची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, आमचे स्टार्स कुठेतरी मिसमॅच होत आहेत. हे असे का होत आहे ते मला माहिती नाही. मी परवा भाजपात प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी फोन केला होता. खूप दिवसांनी त्यांनी मला फोन केला होता. पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले.

अशोक चव्हाण म्हणाले, मात्र राज्यसभा उमेदवारीबद्दल मला काही सांगता येणार नाही. कारण तेव्हा मी भाजपात नव्हतो. माझे येणे आणि नारायण राणे यांचे जाणे याचा काही संबंध नाही. पक्ष नेतृत्वाने असा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही. माझ्या उमेदवारीबद्दल ठरले होते असे मी म्हणणार नाही.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाला वाटले असेल की माझ्यासारखा अनुभवी नेता,
ज्याने प्रशासनात काम केले आहे, ज्याने राजकीय क्षेत्रात काम केले आहे, त्याचा दिल्लीत अधिक उपयोग होऊ शकतो.
त्यामुळे तातडीने त्यांनी निर्णय घेऊन मला संधी दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना