पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे आज काँग्रेस भवन येथे तृतीयपंथीसाठी हळदी-कुंकू समारंभ

ADV
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “एक सन्मान त्यांचा ही” हळदी – कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले. या प्रसंगी तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे १०० हुन अधिक तृतीयपंथी उपस्थित होते. या प्रसंगी सोनाली मारणे (अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस) प्रास्ताविक केले व आलेल्या सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी मा. माजी आमदार दीप्ती चौधरी, नीता राजपूत, सरोज डाकी, छायाताई जाधव व असंख्या महिला उपस्थित होते.

मा.माजी आमदार दीप्ती चौधरी, नीता राजपूत, सोनाली मारणे यांच्या हस्ते आलेल्या सर्व तृतीयपंथींना हळदी-कुंकू लावून तिळगुळ व पर्सचे वाटप करण्यात आले.तृतीयपंथींचे रंजिता नायक, रमोला दीदी त्यांच्या (गुरु), चेतन राजपूत, मायाताई, सोनाली दळवी यांना या प्रसंगी पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे या सर्वांना पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्त करून नियुक्ती पत्र

मा.दीप्ती चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सोनाली मारणे (अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस) यांनी केले.

सूत्रसंचलन शर्वरी गोतारने यांनी केले तर आभार सारिका मुंडावरे यांनी केले.