Pune CNG Pump | पुण्यातील CNG पंपासंदर्भात नवा खुलासा, केवळ ‘हे’ पंप बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CNG Pump | सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये (Trade Dealer Margin) वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने पुण्यातील टॉरेंट गॅस पंपावर (Torrent Gas Pump) 1 ऑक्टोबरला सीएनजीची विक्री होणार नसल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान ऑल इंडिया डीलर्स असोसिएशनने (All India Dealers Association) याबाबत खुलासा केला आहे. डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याचा निषेध म्हणून उद्या टोरेंट सीएनजी स्टेशन (Pune CNG Pump) असलेले सर्व आऊटलेट्स केवळ एक दिवसासाठी बंद राहणार आहेत.

 

पुण्यातील सीएनजी पंप (CNG Pump) शनिवारी बंद राहणार आहेत. पेट्रोल डीलर असोसिएशनने 1 ऑक्टोबर रोजी नो सेल (No SALE) बद्दल सात दिवसांपूर्वी टोरेंटो आणि ओएमसीला (OMC) कळवले होते. मात्र, त्यावर त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे उद्या (शनिवार) पुण्यातील काही सीएनजी पंप एका दिवसासाठी बंद राहणार आहेत.

 

ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला (Spokesperson Ali Daruwala) यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले,
डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याचा निषेध म्हणून उद्या टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व आऊटलेट्स फक्त एक दिवस बंद राहतील.
तथापि, पुणे शहराच्या हद्दीतील सीएनजी स्टेशन्स ज्यांना MNGL पुरवठा आहे, ते दिवसभर उघडे राहतील.
फक्त महामार्गावरील सीएनजी पंप बंद राहतील. यासोबत पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.
त्यामुळे पुणे शहरातील ग्राहकांनी घाबरून जाण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही.

 

Web Title :- Pune CNG Pump | pune cng pump close for one day tomorrow new update all india petrol dealers association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसर पोलिसांकडून चार गंभीर गुन्ह्यांची उकल; खुन, दरोड्यासह दोन जबरी चोरीतील ८ जणांना अटक

Kishori Pednekar | भाजपाच्या राम कदमांना शिवसेनेचे रोखठोक प्रत्युत्तर, पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार

Former MLA Mohan Joshi | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी’ -मोहन जोशी