Pune Crime | हडपसर पोलिसांकडून चार गंभीर गुन्ह्यांची उकल; खुन, दरोड्यासह दोन जबरी चोरीतील ८ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अवघ्या ४८ तासामध्ये खुन (Murder), दरोडा (Robbery) आणि दोन जबरी चोरीतील ८ जणांना अटक (Arrest) केली. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. (Pune Crime)

 

ट्रकचालकाला दुचाकी आडवी लावून लुटमार करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबरला मंतरवाडी परिसरात घडली होती. ओमकार ऊर्फ खंड्या राजु शिंदे Omkar alias Khandya Raju Shinde (वय २२ रा. वैदुवाडी हडपसर) याच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. राम सुदाम मोहाळे Ram Sudam Mohale (रा. खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी तक्रार दिली.

 

भंगार साहित्य विक्री पैशांच्या वादातून एकाला बेदम मारहाण (Beating) करीत खून करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. कृष्णा विठ्ठल रेखले Krishna Vitthal Rekhale (वय २७ वर्ष रा. कवडी गाव टोल नाका, लोणीकाळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सागर गायकवाड (Sagar Gaikwad) असे खून (Murder In Pune) झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला धमकावून लुटणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश भारत पांचाळ Rishikesh Bharat Panchal (वय २० वर्ष रा. जेएसपीएम कॉलेज पाठीमागे, आदर्शनगर ऊरूळी देवाची) आकाश दिपक साटम Akash Deepak Satam (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजय रामदास उमाळे Sanjay Ramdas Umale (वय ४२) यांनी तक्रार दिली होती. (Pune Crime)

कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली.
शुभम रमेश मोरे Shubham Ramesh More (वय २२) प्रसाद हनुमंत कांबळे Prasad Hanumant Kamble (वय २१)
हेमंत संदीप चौगुले Hemant Sandeep Chaugule (वय २०) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
फरारी साथीदार कौतुक क्षिरसागर, अंबर शेख, रोहन धोत्रे, धनेश शिंदे यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner Namdev Chavan),
उपायुक्त नम्रता पाटील (Deputy Commissioner Namrata Patil) मॅडम, एसीपी बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde),
पोलीस निरीक्षक विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle),
एपीआय विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde), पोलीस अविनाश शिंदे समिर पांडुळे, प्रशांत दुधाळ,
निखील पवार, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Four serious crimes solved by Hadapsar police; 8 persons arrested in murder, robbery and two forced thefts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | केवळ अर्ध्या तासात पुणे शहरात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना, एकाचा मृत्यू

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल