पाण्यासाठी काँग्रेसचे भजन आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणेकरांवर पाणी कपातिची टांगती तालावर आहे काही दिवसांनपूर्वी ‘गिरीश काय रे…?‘ च्या पोस्टरबाजीतून पुण्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. आता शहरासाठी राखीव हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेसने कसबा गणपतीसमोर भजन करत आंदोलन केले. पाणी प्रश्नी पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुध्दी मिळावी, यासाठी काँग्रसने या भजन आंदोलनातून कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या भजन आंदोलनात काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी स्वतः पेटी तबला वाजवून भजन गायले.
पुणे शहराला १६ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात फक्त १७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणी जुलै महिन्यापर्यंत कसे पुरणार? हा प्रत्येक नागरिकांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. शासनाने पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नसल्याची ओरड जनतेमधून होत आहे. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाण्याची काटकसर आणि पाणी कपात अटळ आहे. असे असताना पाणी प्रश्नावर राजकीय पक्ष फक्त राजकारण करताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रश्नावर सर्व पक्षीय नेते एकत्र बसून नियोजन करत नाहीत, असा आरोप जनतेमधून केला जात आहे.
गिरीश काय रे … ? ची पोस्टरबाजी 
पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट असतानाच शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात बॅनरबाजी केली होती . ‘गिरीष काय रे?, दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही’ असा मजकूर असलेले बॅनर शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आला होता.  हे बॅनर कोणी लावले आहेत, हे अद्याप अस्पष्ट असले तरी हे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले होते
शहरात पाणीकपात निश्चित असली तरी नेमकी किती टक्के पाणीकपात होणार हे अजून अस्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले होते. ’गिरीष काय रे?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतंय?’ असा मजकूर या बॅनरवर आहे. बॅनरखाली एक त्रस्त पुणेकर नागरिक असे लिहिण्यात आले होते.