Pune Congress | आनंदनगर झोपडपट्टीवासियांना मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी भाजप आमदार कांबळेंसह भाजप लोकप्रतिनिधींना अटक करावी – शहर कॉंग्रेस

नागरिकांचे नियमाने पुनर्वसन करून संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress | गंगाधाम चौक नजीकच्या आंनदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करा म्हणणार्‍या भाजपाचे आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आणि महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Pune Congress)

 

शिष्टमंडळामध्ये माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सचिन आडेकर सहभागी झाले होते.

 

 

निवेदन देताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना आनंदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करून घेतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला व आमदार, नगरसेवक आणि माजी नगरसेविकेचे पती व त्यांच्या सोबत असलेले रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे या कारवाईमध्ये दिसत आहेत हे निदर्शनास आणून दिले. याबाबत योग्य ते कायदेशिर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी तसेच आनंदनगर वसाहत येथे २४ तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. अनाधिकृत इमारतीत झालेल्या सक्तीच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. (Pune Congress)

 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना २०५ अंतर्गत रस्ता महापालिकेच्या शेवटच्या पुणे मनपाच्या सार्वजनिक सभेमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाने करून घेतला.
हिलटॉप, हिलस्लोप जागेवरील अनाधिकृत बांधलेल्या ५ मजली इमारतीमध्ये बेकायदेशिररित्या पुनर्वसनाचे काम केले जात आहे.
एस.आर.ए. चे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सदर ठिकाणचे एस.आर.ए. प्रकल्प रद्द झाल्याचे आक्षेपार्हरित्या पत्र पुणे मनपास दिले आहे.
ही झोपडपट्टी ४० वर्षापासुन असून महापालिकेनेही घोषित केलेली झोपडपट्टी आहे.
आनंदनगर वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांचे नियमानुसार नागरिकांच्या मागणीनुसार पुनर्वसन करण्यात यावे.
आनंदनगर वसाहतीतील अघोषित भागातील झोपड्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे ज्या अनाधिकृत इमारतीत पुनर्वसन केले आहे
त्या अनाधिकृत इमारतीची कायदेशिर वैधता तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
भाजपाने बहुमताच्या जोरावर शासनाने जाहिर केलेल्या अधिसूचनेच्या विसगंत मान्य केलेला पुणे मनपा मुख्य सेभेचा ठराव
व आयुक्तांनी दिलेली ऑफिस ऑर्डर विखंडीत करण्यात यावी अशी मागणी यावेळी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

 

Web Title :- Pune Congress | BJP come. Sunil Kamble, Corporator Rajendra Shilimkar, Mr. Madhuri Misal’s brother Manoj Deshpande should be booked and arrested – Arvind Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Krushi Utpanna Bazar Samiti Maharashtra Elections | राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

 

BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल