Pune Corona News | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 269 नवीन रुग्ण, 220 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा (New patient) कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या घटत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 269 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 220 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात (Pune City) आजपर्यंत 4 लाख 79 हजार 072 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 67 हजार 725 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात (Pune) गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील (Out of Pune Municipal Corporation limits) 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात (Pune City) 8599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 2748 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये (Pune City) सध्या 2748 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 285 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील (Pune City) विविध केंद्रावर 6694 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 26 लाख 81 हजार 143 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.32 %

पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत (Corona infected) एकूण 10 लाख 52 हजार 313 रुग्णांपैकी 10 लाख 24 हजार 121 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 10 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.70 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.

Web Titel :- Pune Corona News | 269 new corona patients in Pune in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू