Pune Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 450 पेक्षा अधिक नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं गेल्या काही दिवसांमधील आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे तब्बल 465 नवीन रूग्ण आढळून आले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे मनपाच्या हद्दीबाहेरील तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 2 हजार 156 रूग्ण सक्रिय आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 184 रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील गेल्या चार-आठ दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 812 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे. आगामी काळात विना मास्क फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

१८ फेब्रुवारी

–  दिवसभरात ४६५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

–  दिवसभरात १८४ रुग्णांना डिस्चार्ज.

–  पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. ०३ रूग्ण पुण्याबाहेरील.

–  १५४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

–  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १९६३८९.

–  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१५६.

–  एकूण मृत्यू -४८१२.

– आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १८९४२१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४४२४.