Coronavirus : पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1036 नवे पॉझिटिव्ह तर 42 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. सध्या देशात अनलॉक 5.0 सुरू आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1036 नवे पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात पुणे शहरातील तब्बल 42 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 18 जणांचा आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3528 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1170 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 46 हजार 327 एवढी झाली आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 26 हजार 430 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 16 हजार 369 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 913 जण क्रिटिकल असून त्यापैकी तब्बल 512 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूग्णांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.