ताज्या बातम्यापुणे

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 2025 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 4825 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 025 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 825 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 46 हजार 564 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 50 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 358 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 4 हजार 825 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 54 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 13 हजार 107 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 33 हजार 732 इतकी आहे. यापैकी 1401रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 18 एप्रिलपासून आजपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 22 हजार 850 ने कमी झाली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 13 हजार 618 रुग्णांपैकी 7 लाख 99 हजार 346 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 118 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.49 टक्के आहे.

Back to top button