Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1737 नवे पॉझिटिव्ह तर 36 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1637 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 36 जणांचा आज मृत्यू झत्तला आहे. पुण्याबाहेरील तब्बल 24 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 3332 वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरातील सर्वात समाधानाची बाब म्हणजे आज तब्बल 1795 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडो 1 लाख 40 हजार 588 वर जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये तब्बल 1 लाख 19 हजार 588 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 679 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 932 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी तब्बल 514 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.