Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1270 जणांनी केली ‘कोरोना’वर मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचेच काहीसे परिणाम समोर येत आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 1270 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1270 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 643 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं पुणे शहरातील 30 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत तब्बल 3709 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 50 हजार 433 पर्यंत गेली आहे. सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 32 हजार 450 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 14 हजार 184 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 925 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 428 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.