Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 798 नवे पॉझिटिव्ह तर 32 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 798 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील 32 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 6 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3763 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे तबबल 805 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 200 पर्यंत गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 34 हजार 405 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 14 हजार 32 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 869 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 496 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.