Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 489 नवे पॉझिटिव्ह तर 21 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 489 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात पुण्याबाहेरील 15 जणांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 3941 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आज कोरोनाचे 681 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 633 वर गेली आहे. त्यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 42 हजार 369 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 10323 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 838 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 446 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.