Pune : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 284 नवे पॉझिटिव्ह तर 16 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं समोर येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 284 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला. त्यामुळं आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 4211 पर्यंत पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 322 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 961 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 51 हजार 145 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 605 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 584 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 333 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत.