Pune Coronavirus News : पुणे शहरात दिवसभरात 387 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह. 4 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune City) गुरुवारी (दि.7) 387 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 393 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus) मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 043 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 202 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 663 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 678 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 80 हजार 674 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 73 हजार 333 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतातील कोरोना लसीकरणाचा केंद्रबिंदू पुणे

कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरुवात होणार आहे. मात्र, त्या अगोदर शुक्रवारी (दि.8) देशभरातील 33 राज्ये व केंद्रशासीत प्रदेशामध्ये दुसरा ड्राय रन घेतला जाणार आहे. तर देशभरात लस वितरणासाठी पुणे हे मध्यवर्ती केंद्र असणार आहे.