Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1938 नवे पॉझिटिव्ह तर 38 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले वाढले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1938 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 38 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 21 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 2706 वर जावून पोहचली आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे आज 1573 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 15 हजार 770 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 96 हजार 25 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 39 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूणांपैकी 917 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 470 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.